HOSPITALITY MANAGEMENT TRAINEE STOOD FIRST IN SOLO COMPETITION IN ICTEM COLLAGE IN MULUND
औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), कर्जत जिल्हा- रायगड, या संस्थेतील हॉस्पिटॅलिटी सेक्टरमधील फुड प्रोडक्शन जनरल तसेच फुड अँड बेव्हरेज या व्यवसायामधील एकूण सात प्रशिक्षणार्थी
आय. टी. सी. एस. एम. कॉलेज मुलुंड येथे आयोजित दिनांक ५ ते ७ मार्च २०२२ रोजी रोजी
“AURA CHEF 2K22” स्पर्धेत मुंबईतील नामवंत महाविद्यालयातील स्पर्धकांन बरोबर भाग घेतला होता, सदर स्पर्धेत कुमार दंत आदर्श तसेच कुमारी थोरवडे प्रज्ञा या प्रशिक्षणार्थ्यांनी सामूहिक स्पर्धेत तृतीय क्रमांक तसेच कुमारी थोरवडे प्रज्ञा हिने वैयक्तिक स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला. सदर स्पर्धेत असलेल्या परीक्षकांकडून विशेष कौतुक करण्यात आले. सदर प्रशिक्षणार्थ्यांना संस्थेतील निदेशक श्री सुयोग शेठ आणि निदेशक श्रीमती दिपाली भावसार यांचेबहुमुल्य मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल या सर्वांचे संस्थेतील प्राचार्य प. का. सोनवणे तसेच सर्व कर्मचारीवर्ग यांस कडून अभिनंदन करण्यात आले. महिलादिन या दिवशी त्यांचा विशेष सत्कार देखील संस्थेच्या वतीने करण्यात आला.