राजर्षी शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर
दिनांक २६/०५/२०२३ रोजी “आमराई रिसॉर्ट सभागृह, विक्रमगड” येथे सकाळी ०९.०० ते दु. ०१.०० या वेळेत आय.टी.आय.विक्रमगड कडून “राजर्षी शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर” घेण्यात येणार आहे. विक्रमगड, जव्हार, वाडा, मोखाडा या परिसरातील नवयुवकांनी ( विशेषतः:१५ ते २५ वयोगटातील तरुणांनी) या मार्गदर्शन शिबिराचा आवश्य लाभ घ्यावा. या शिबिरात दहावी-बारावीनंतर पुढे करिअर च्या वाटा, रोजगार-स्वयंरोजगार तसेच विविध अनुषंगिक विषयांवर ख्यातनाम तज्ञ मार्गदर्शक नवतरुणांना मार्गदर्शन करणार आहेत.
खाली दिलेला QR कोड स्कॅन करून आपण या करिअर शिबिरासाठी आपली नोंदणी करू शकता.
वर दिलेला QR कोड स्कॅन करून आपण या करिअर शिबिरासाठी आपली नोंदणी करू शकता.
या शिबिरातील दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा सर्व साधारणपणे खालील कार्यक्रम पत्रिकेनुसार राहील.