Type in Marathi
You may type here in marathi & paste in chat
Click here to enable marathi keyboard in your windows
Directorate of Vocational Education and Training, Maharashtra State District Vocational Education Office, Palghar
Email dveto.palghar@dvet.edu.in
Phone 9567456345
About - ITI VIKRAMGAD

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था विक्रमगड

ITI Vikramgad - Assembly of trainees


या संस्थेची स्थापना सन २००६ या वर्षी झाली आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई (महाराष्ट्र शासन) यांच्या अधिपत्याखाली विक्रमगड (जिल्हा- पालघर) येथे हि संस्था सुरु आहे. आदिवासी बहुल क्षेत्रात असणाऱ्या विक्रमगड या तालुक्यातील युवकांना आधुनिक औद्योगिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगार करण्यास सक्षम बनविण्यासाठी हि संस्था अविरत कार्यरत आहे. या संस्थेत एकूण 0८ व्यवसाय (ट्रेड) आहेत. या 0८ व्यवसाय (ट्रेड) पैकी ०४ ट्रेड हे 'एक वर्ष' मुदतीचे तर ०४ ट्रेड 'दोन वर्ष' मुदतीचे आहेत. प्रत्येक ट्रेडच्या फक्त एकाच तुकडीला मान्यता असल्याने फक्त ०८ तुकड्या सुरु आहेत. त्यांचे विवरण खालील कोष्टकात (टेबलमध्ये) दिले आहे. प्रत्येकी फक्त एकाच तुकडीला मंजुरी असल्यामुळे दोन वर्षे मुदतीच्या ट्रेड पैकी MMV-FT आणि ET-TDM हे ट्रेड एका वर्षा आड प्रवेशाकरिता उपलब्ध असतात. एक वर्ष मुदतीचे सर्व ट्रेड दरवर्षी प्रवेशासाठी उपलब्ध असतात.

अ.क्र. व्यवसाय (ट्रेड) मंजूर जागा प्रवेशसत्र 2021-22 साठी उपलब्ध जागा  प्रशिक्षण कालावधी सविस्तर माहिती
1 इलेक्ट्रिशियन [ET] २० २० २ वर्षे
2 फिटर [FT] २० २ वर्षे
3 मेकॅनिक मोटर वेहीकल [MMV] २४ २ वर्षे
4 टूल & डाय मेकर [TDM] २४ २४ २ वर्षे
5 वेल्डर [WD] २० २० १ वर्षे
6 मेकॅनिक डिझेल [DLM] २४ २४ १ वर्षे
7 सुईंग टेक्नोलॉजी [ST] २० २० १ वर्षे
8 कॉम्प्युटर ऑपरेटर & प्रोग्रामिंग असिस्टंट [COPA] २४ २४ १ वर्षे
 
सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे प्रवेश(admission) हे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच होतात.  संस्थेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी प्रवेशाचे वेळापत्रक व प्रवेशासंबंधी अधिक माहिती यांसाठी खालील संकेत स्थळाला भेट द्यावी.
आय.टी.आय. ऑनलाईन प्रवेशासाठीची वेबसाईट =       https://admission.dvet.gov.in  
About Principal
[:en]श्री.आर.पी.चुंबळे    

आपला महाराष्ट्र हे औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर असे राज्य आहे. आपला तालुका व जिल्ह्यालगतच्या परिसरातही अनेक औद्योगिक आस्थापना (कंपन्या) आहेत. या विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांमध्ये अनेक रोजगाराच्या संधी (नोकऱ्या) उपलब्ध आहेत. स्थानिक तरुणांनी या संधीचा आपल्या रोजगारासाठी उपयोग करून घ्यावा. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपल्या आवडीच्या व्यवसायाचे औद्योगिक प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.

'औद्योगिक प्रशिक्षण संस्था विक्रमगड' हि शासकीय संस्था विक्रमगड येथे कार्यरत असून या संस्थेत उद्योगक्षेत्रातील विविध व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाद्वारे तरुणांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी सक्षम बनविले जाते. महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या संधीचा तरुणांनी अधिकाधिक उपयोग करून स्वत:ला रोजगार अथवा स्वयंरोजगारासाठी सक्षम बनवावे.

--- श्री.आर.पी.चुंबळे (प्राचार्य, औ.प्र.संस्था विक्रमगड)

[:mr]श्री.आर.पी.चुंबळे    

आपला महाराष्ट्र हे औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर असे राज्य आहे. आपला तालुका व जिल्ह्यालगतच्या परिसरातही अनेक औद्योगिक आस्थापना (कंपन्या) आहेत. या विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांमध्ये अनेक रोजगाराच्या संधी (नोकऱ्या) उपलब्ध आहेत. स्थानिक तरुणांनी या संधीचा आपल्या रोजगारासाठी उपयोग करून घ्यावा. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपल्या आवडीच्या व्यवसायाचे औद्योगिक प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.

'औद्योगिक प्रशिक्षण संस्था विक्रमगड' हि शासकीय संस्था विक्रमगड येथे कार्यरत असून या संस्थेत उद्योगक्षेत्रातील विविध व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाद्वारे तरुणांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी सक्षम बनविले जाते. महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या संधीचा तरुणांनी अधिकाधिक उपयोग करून स्वत:ला रोजगार अथवा स्वयंरोजगारासाठी सक्षम बनवावे.

--- श्री.आर.पी.चुंबळे (प्राचार्य, औ.प्र.संस्था विक्रमगड)

[:]
 • 1
  करिअर मार्गदर्शन शिबीर दि. २६ मे २०२३ रोजी विक्रमगडमधील आमराई रिसॉर्ट सभागृह येथे छत्रपती शाहू महाराज करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे.
 • 2
  प्रवेश प्रोत्साहन अभियान -
  प्रवेश सत्र २०२१-२२ करिता ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरु आहे. आय.टी.आय. प्रवेश प्रक्रियेबाबत जनजागृती होण्यासाठी आणि जास्तीत जास्त उमेदवारांनी प्रवेश अर्ज करावेत याकरिता आय.टी.आय.विक्रमगड  "संस्थेमार्फत प्रवेश प्रोत्साहन अभियान"  अंतर्गत विक्रमगड शहरात मुख्य चौक, बस स्टॉप इत्यादी ठिकाणी माहिती दर्शक फलक (फ़्लेक्स बॅनर) लावले. तसेच कार्यक्षेत्रातील विविध माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये जाऊन याबाबत माहिती दिली.
 • 3
  प्राचार्य पदावर श्री.आर.पी.चुंबळे औद्योगिक प्राशिक्षण संस्था विक्रमगड च्या प्राचार्य पदाचा अतिरिक्त कार्यभार औ. प्र. संस्था पालघर चे प्राचार्य श्री.एस.एन.परदेशी यांच्याकडे मार्च २०१७ पासून होता. त्यांची बदली औ. प्र. संस्था मुलुंड (जि.ठाणे) येथे झाल्यामुळे त्यांच्याकडे असलेला हा अतिरिक्त कार्यभार औ. प्र. संस्था मोखाडा (जि.पालघर) चे प्राचार्य श्री.आर.पी.चुंबळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. श्री.आर.पी.चुंबळे यांनी दि.०५/०६/२०२१ रोजी औ. प्र. संस्था विक्रमगड च्या प्राचार्य पदाचा अतिरिक्त कार्यभार स्विकारला.
Events
 • 26 May
  राजर्षी शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर
  दिनांक २६/०५/२०२३ रोजी "आमराई रिसॉर्ट सभागृह, विक्रमगड" येथे सकाळी ०९.०० ते दु. ०१.०० या वेळेत आय.टी.आय.विक्रमगड कडून "राजर्षी शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर" घेण्यात येणार आहे. विक्रमगड, जव्हार, वाडा, मोखाडा या परिसरातील नवयुवकांनी ( विशेषतः:१५ ते २५ वयोगटातील तरुणांनी) या मार्गदर्शन शिबिराचा आवश्य लाभ घ्यावा. या शिबिरात दहावी-बारावीनंतर पुढे करिअर च्या वाटा, रोजगार-स्वयंरोजगार तसेच विविध अनुषंगिक विषयांवर ख्यातनाम तज्ञ मार्गदर्शक नवतरुणांना मार्गदर्शन करणार आहेत.

  खाली दिलेला QR कोड स्कॅन करून आपण या करिअर शिबिरासाठी आपली नोंदणी करू शकता.
  वर दिलेला QR कोड स्कॅन करून आपण या करिअर शिबिरासाठी आपली नोंदणी करू शकता.

  या शिबिरातील दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा सर्व साधारणपणे खालील कार्यक्रम पत्रिकेनुसार राहील.

 • 09 Aug
  आदिवासी दिन - या संस्थेत दि. ०९ ऑगस्ट २०२१ रोजी आद्य आदिवासी क्रांतिकारक "बिरसा मुंडा" यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून "आदिवासी दिन" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
 • 05 Jun
  वृक्षारोपण - जागतिक पर्यावरण दिन (०५ जुन २०२१) आज दि. ०५/०६/२०२१ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था विक्रमगड या संस्थेच्या प्राचार्य पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. आर. पी. चुंबळे यांनी श्री. एस. एन. परदेशी यांच्याकडून स्विकारला.  आज येथे ०५ जून २०२१ रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले.
Notification & Circular