शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था विक्रमगड

| अ.क्र. | व्यवसाय (ट्रेड) | मंजूर जागा | प्रवेशसत्र 2021-22 साठी उपलब्ध जागा | प्रशिक्षण कालावधी | सविस्तर माहिती |
| 1 | इलेक्ट्रिशियन [ET] | २० | २० | २ वर्षे | |
| 2 | फिटर [FT] | २० | ० | २ वर्षे | |
| 3 | मेकॅनिक मोटर वेहीकल [MMV] | २४ | ० | २ वर्षे | |
| 4 | टूल & डाय मेकर [TDM] | २४ | २४ | २ वर्षे | |
| 5 | वेल्डर [WD] | २० | २० | १ वर्षे | |
| 6 | मेकॅनिक डिझेल [DLM] | २४ | २४ | १ वर्षे | |
| 7 | सुईंग टेक्नोलॉजी [ST] | २० | २० | १ वर्षे | |
| 8 | कॉम्प्युटर ऑपरेटर & प्रोग्रामिंग असिस्टंट [COPA] | २४ | २४ | १ वर्षे |
आपला महाराष्ट्र हे औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर असे राज्य आहे. आपला तालुका व जिल्ह्यालगतच्या परिसरातही अनेक औद्योगिक आस्थापना (कंपन्या) आहेत. या विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांमध्ये अनेक रोजगाराच्या संधी (नोकऱ्या) उपलब्ध आहेत. स्थानिक तरुणांनी या संधीचा आपल्या रोजगारासाठी उपयोग करून घ्यावा. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपल्या आवडीच्या व्यवसायाचे औद्योगिक प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
'औद्योगिक प्रशिक्षण संस्था विक्रमगड' हि शासकीय संस्था विक्रमगड येथे कार्यरत असून या संस्थेत उद्योगक्षेत्रातील विविध व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाद्वारे तरुणांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी सक्षम बनविले जाते. महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या संधीचा तरुणांनी अधिकाधिक उपयोग करून स्वत:ला रोजगार अथवा स्वयंरोजगारासाठी सक्षम बनवावे.
--- श्री.आर.पी.चुंबळे (प्राचार्य, औ.प्र.संस्था विक्रमगड)
[:mr]

[:]
दि. २६ मे २०२३ रोजी विक्रमगडमधील आमराई रिसॉर्ट सभागृह येथे छत्रपती शाहू महाराज करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे.
राजे यशवंत मुकणे औद्योगिक प्रशिक्षण संस्था(आदिवासी) येथे तंत्र प्रदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. श्री.विश्वनाथ पाटील साहेब(समाजसेवक) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. विक्रमगड हायस्कूलचे विद्यार्थी तसेच येथील शिक्षक यांनी प्रदर्शनासाठी उपस्थिती दर्शवली.
दि. 12 जानेवारी 2026 रोजी, राजे यशवंत मुकणे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था विक्रमगड येथे राष्ट्रीय युवा दिन, स्वामी विवेकानंद जयंती आणि राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून विक्रमगड हायस्कूलचे सहशिक्षक श्री.अनिल बडगुजर सर उपस्थित होते. तसेच संस्थेचे गटनिदेशक, निदेशक,इतर कर्मचारी वर्ग आणि सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
वर दिलेला QR कोड स्कॅन करून आपण या करिअर शिबिरासाठी आपली नोंदणी करू शकता.
या संस्थेत दि. ०९ ऑगस्ट २०२१ रोजी आद्य आदिवासी क्रांतिकारक "बिरसा मुंडा" यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून "आदिवासी दिन" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.