औ प्र संस्था, मुलुंड येथे कौशल्य विकास मंत्री मा. नवाब मलिक साहेब यांनी भेट दिली.
आज औ प्र संस्था, मुलुंड येथे कौशल्य विकास मंत्री मा. नवाब मलिक साहेब यांनी भेट दिली. यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून संस्थेतील अंतर्गत रस्त्याच्या डांबरीकरणाचे कामाचा शुभारंभ करण्यात आला.
त्यांनतर मियावकी वृक्षारोपणाची पाहणी केल्यानंतर संस्थेने नवीन तयार केलेल्या संगणक कार्यशाळे चे उदघाटन केले.
मा मंत्री महोदय श्री. नवाब मलिक साहेब व मा. सहसंचालक श्री. अनिल जाधव साहेब यांचे उपस्थितीत ITC Grand Maratha hotel सोबत, Daul System Training अंतर्गत Food Beverage Assistant या व्यवसायाकरिता सामंजस्य करार करण्यात आला. या करारावर श्री. कुलकर्णी साहेब आणि संस्थेचे प्राचार्य श्री दुर्गे साहेब यांनी सह्या केल्या.यावेळी मुंबई विभागाचे सहसंचालक श्री जाधव साहेब, संस्थेचे प्राचार्य तथा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी मुंबई उपनगर श्री प्रदीप दुर्गे ,उपप्राचार्य श्री संदीप परदेशी व निरिक्षक श्री अनिल सदाफुले उपस्थित होते.