Type in Marathi
You may type here in marathi & paste in chat
Click here to enable marathi keyboard in your windows
Directorate of Vocational Education and Training, Maharashtra State DVET RO - Mumbai
Email jtdir.mumbai@dvet.gov.in
Phone -
About Mumbai Region
​    

                                                                      

 
 

               

E-Governance

         

 

 
Joint Director Message
प्रिय सहकारी
       मला तुम्हाला आज एक विनंती करायची आहे. आपण सर्वांनी आपल्या परीने खूप खूप छान काम केले आहे आपण करत राहणार आहे, त्याबद्दल तुमच्या क्षमते बद्दल मला पुर्ण विश्वास आहे. आपण आज पासून एका नवीन भावनेतूनजबाबदारीने हा दिवस माझ्या आयुष्यातील शेवटचा दिवस आहे असे समजून प्रत्येक दिवस आपल्या आय.टी.आय.  मधील ग्रामीण भागातील, आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण उज्वल भवितव्यासाठी व्यतीत करुया असं मला वाटतं, खाली माझे मनोगत व्यक्त करत आहे. कदाचित माझा दृष्टिकोन पटणार नाही, परंतु एक प्रयत्न करुन बघुया, आयुष्यात तसे भरपुर प्रयत्न करुन अपयश आले असेल, परंतु एक निश्चितपणे सांगतो या प्रयत्नात आपल्याला यशच मिळणार, प्रमाण कमी जास्त असेल हाच तो फरक असेल.
        आपल्या आयुष्यात/कुटुंबात अनंत अडचणी/समस्या/प्रश्न/ असतात परंतु आपली आयुष्याप्रती कुटुंबाप्रती असलेल्या बांधिलकी (commitment) मुळे आपण त्यामधून मार्ग काढून जीवन मार्गक्रमण करीत आहोत. आपणा सर्वांना मनुष्य जन्म मिळाला, जोडीला शासकीय नोकरी/नोकरी आहे या क्षणाला आपण जिवंत आहोत हेच जीवनाचा उत्सव साजरा करायला पुष्कळ नाही का?
       हे सर्व असताना आपण  आय.टी.आय. मधील भौतिक, आर्थिक, प्रशासनिक, मानसिक, शारीरिक, पदांची रिक्त संख्या इत्यादी अनंत अडचणी कारणे नमूद करुन आपल्या कुटुंबा प्रती असलेली बांधिलकी जपत आहोत.  मग आय.टी.आय.  मधील ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाप्रती ती का नाही? त्यांच्या भविष्याशी प्रतारणा करण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला? आपण सर्वांनी आतापर्यंत खूप खूप प्रयत्न केलेत. परंतू एकट्या एकट्याने साथ मिळाली नाही म्हणून थकुन गेला आहात, आयुष्यात एक प्रकारची निराशा घेऊन जगत आहात त्याचा परिणाम स्वतःच्या कुटंबात शारीरिक, मानसिक आरोग्यावर झाला असुन विविध व्याधींनी ग्रासले आहे हे बाहेर अभिमानानं सांगता येत नाही, या सर्वामुळे आयुष्यात समाधान नाही, पूर्णवेळ आनंद नाहीं,.... .. नको त्या शर्यतीत भाग घेतलाय ती शर्यत संपणारी आहे त्यामध्ये फक्त दुःख दुःख आणि दुःख वाट्याला आले आहे/येणार आहे नाहीतर ह्या जगातील सर्व श्रीमंत सुखी झाले असते नाही का? 
       एकट्याने केल्याने मर्यादा येत आहेत. चला आपण सर्व मिळून अपल्या आयुष्यात, आय.टी.आय.  मध्ये, शारीरीक, मानसिक, आरोग्य ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या भविष्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी काही एकत्र करुया. त्यामुळे आपले आयुष्य सुंदर होईल आयुष्यात काहीतरी नवीन केल्याचे समाधान मिळेल या विश्वाला आदर्श देऊया शांततेने संतुष्ट भावनेने पंचतत्वात विलीन होऊया. 
       हा प्रवास करताना अनंत अडचणी येणार आहेत. त्यावर एक म्हण आहे गाव करील ते राव काय करील  कारण करणेकरिता शोधुया, करणेकरीता नाही. 
       एक नवीन उमेद, नवीन आशा, नवीन शक्यता जाणीवपूर्वक आपण सर्व मिळून निर्माण करुया हेच स्वतःचे स्वातंत्र्य समजुया मुंबई विभाग, राज्य, देश विश्वाला नवीन दिशा देऊया.... चला तर आजपासून प्रारंभ करूया. नाही-नाही आताच प्रारंभ करूया. क्षण तरी कशाला व्यर्थ जाऊ द्यायचा, मागचा क्षण गेला पुढचा येणार की नाही माहीत नाही.... ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास त्यांचे भविष्य उज्वल करण्याचे भाग्य आपल्याला लाभलय या संधीचा पुरेपूर आनंद घेऊया... एकीचे बळ मिळते फळ. 
 
  • जशी दृष्टी तशी सृष्टी.
  • व्यक्त व्हा, रिक्त व्हा आणि मुक्त व्हा.
  • व्यक्त होणेच मुक्त विद्यापीठ.
  • आयुष्य सुंदर आहे मज्जाच मज्जा.
  • माझ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल घडविण्यासाठी मी जबाबदार.
  • मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार.
  • मीच आहे माझ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा शिल्पकार.
  • मीच आहे माझ्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करणारा शिल्पकार....
       औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करण्याचे भाग्य आपल्याला मिळणार. त्यामुळे आपले आयुष्यातील प्रश्न संपणार म्हणजे आपला दृष्टिकोन बदलणार. परिवर्तन होणार.... चळवळ सुरु. चला तर आजपासून प्रारंभ. नाही-नाही आताच प्रारंभ करूया... 
 
  • विद्यार्थी विकास
  • औद्योगिक प्रशिक्षण संस्था विकास
  • औद्योगिक प्रशिक्षण संस्था विकास म्हणजे आपला विकास अटळ आहे.... विद्यार्थी विकास पाया पक्का करूया....
 
आपल्याच कुटुंबातील सदस्य 
सहसंचालक 

Events
  • 13 Aug
    पारंपारिक क्रिडा महाकुंभ पारंपारिक क्रिडा महाकुंभ , ऒद्योगिक प्रशिक्षण संस्था ,कुर्ला येथे संपन्न झाला. Photo Gallery...
  • 06 Jun
    शिवराजाभिषेक सोहळा मराठी माणसांचा स्वप्नपुर्ती दिन म्हणून आजही मराठी जनांच्या हृदयात विराजमान असलेला ६ जून हा दिन ऒद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलुंड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. Photo Gallery..............    
  • 15 Jul
    Celebration of World Youth Skill Day दिनांक 15 जुले 2025 रोजी जागतिक युवा कौशल्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. Photo Gallery...  
  • 09 Apr
    विभागातील कार्यरत अधिकारी यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर याचे प्रशिक्षण (AI Tools for office Productivity)   Management Development Program on AI Tools for Office Productivity held by ALTAS Skill Tech University.  Photo Gallery ...      
  • 17 Apr
    विभागातील कार्यरत कर्मचारी यांचे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर याचे प्रशिक्षण (AI Tools for Office Productivity) Photo Gallery....
  • 05 Apr
    Participation in DIPEX 2025 Photo Gallery...
  • 12 Feb
    Technical Exhibition 2024-25 तंत्रप्रदर्शन (संस्थास्तर) - माहे डिसेंबर २०२४ तंत्रप्रदर्शन (जिल्हास्तर ) - माहे डिसेंबर २०२४ विभागीय तंत्रप्रदर्शन - माहे फेब्रुवारी २०२५ Photo Gallery...
  • 26 Feb
    Swachhata Shramdan Camp
  • 03 Feb
    नवनियुक्त शिल्पनिदेशक यांचे ५ दिवसीय प्रशिक्षण शिबीर
  • 17 Feb
    नवनियुक्त शिल्पनिदेशकांना अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर या करीता १२ दिवसांचे निवासी प्रशिक्षण (IGTRऔरंगाबाद ) Photo Gallery...