Type in Marathi
You may type here in marathi & paste in chat
Click here to enable marathi keyboard in your windows
Directorate of Vocational Education and Training, Maharashtra State District Vocational Education Office, Sindhudurg
Email dveto.sindhudurg@dvet.edu.in
Phone 9567456345
About - 'वंदे मातरम' ची 150 वर्षे, सार्धशताब्दी' सोहळा

'वंदे मातरम' ची 150 वर्षे, सार्धशताब्दी' सोहळा - भारतमातेच्या स्तुतीचा गौरव दिन

(दिनांक: ०७ नोव्हेंबर, २०२५)

जयानंद मठकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावंतवाडी. 



"वंदे मातरम" या राष्ट्रगीताच्या १५० वर्षांच्या गौरवशाली पूर्तीनिमित्त, 'वंदे मातरम सार्धशताब्दी' महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भारतमातेच्या स्तुतीचा गौरव दिन म्हणून साजरा झालेला हा सोहळा जयानंद मठकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यांच्यावतीने राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, सावंतवाडी यांच्या सभागृहात मोठ्या उत्साहात व सुंदर वातावरणात संपन्न झाला. या वेळी वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी सुमारे १६५० विध्यार्थी, शिक्षक वर्ग, पालकवर्ग, प्रतिष्ठीत नागरिक, विविध क्षेत्रातील सन्माननीय अतिथी तसेच विविध शासकीय कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून श्री. श्रीधर पाटील, मा. तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, सावंतवाडी यांची उपस्थिती लाभली. तसेच सादर कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ता म्हणून श्री. अमित गोपाल नाईक, मोबिलायझेशन अधिकारी, ज्ञानदा गुरुकुल पुणे हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या मूर्तीला मान्यवरांकडून पुष्पहार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष सावंतवाडी तहसीलदार श्री. श्रीधर पाटील यांच्यासह सहा. गटविकास अधिकारी श्री. मंगेश जाधव, गटशिक्षणाधिकारी श्री. कमलाकर ठाकूर, सहा. आयुक्त कौशल्य विकास यांचे प्रतिनिधी श्री. नामदेव सावंत, सह. पोलीस निरीक्षक श्री. जयेश खंदरकर, क्रीडापटू श्री. गुरुनाथ चोडणकर, संत श्री. राजेश वाडकर, गडकिल्ले संवर्धन समिती सदस्य श्री. अभिषेक रेगे व श्रीमती संपदा राणे, नावूध्योजक श्री. मिहीर मठकर, महिला बचत गट प्रमुख श्रीमती श्रिया सावंत, सिंधू सेवा सहयोग प्रतिष्ठानचे डॉ. प्रविणकुमार ठाकरे, ज. म. शासकीय औ. प्र. संस्थेचे उपप्राचार्य श्री. निलेश ठाकूर, गटनिदेशिका श्रीमती. सुचिता नाईक, राणी पार्वती देवी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती. संप्रवी कशाळीकर  आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात ‘वंदे मातरम’ या संपूर्ण राष्ट्रगीताचे उपस्ठीतीतांच्या वतीने समूह गायन करण्यात आले. त्यानंतर संस्थेचे निदेशक श्री. कामेश माळकर व प्रशिक्षणार्थी यांनी वंदे मातरम या राष्ट्रगीताचा अर्थ समजावून सांगण्यासाठी लागू नाटिका सादर केली. या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख वक्ते श्री. अमित नाईक यांनी वंदे मातरम या गीताबद्दल उपस्थितांना बहुमुल्य मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. श्रीधर पाटील साहेब यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. सूत्रसंचालन श्री. उमेश कुलकर्णी यांनी केले. हा महोत्सव केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर देशाप्रती असलेली निष्ठा आणि आदरांजली व्यक्त करण्याचा उत्सव होता. हा 'वंदे मातरम सार्धशताब्दी' सोहळा वंदे मातरमच्या मूल्यांची आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत करणारा ठरला.  

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयानंद मठकर औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावंतवाडी या संस्थेचे सर्व निदेशक, कार्यालयीन कर्मचारी व प्रशिक्षणार्थी यांनी मोलाची भूमिका पार पाडली.  
कार्यक्रमाची क्षणचित्रे 
About Principal
  • 1
    वंदे मातरम' ची 150 वर्षे, सार्धशताब्दी' सोहळा - भारतमातेच्या स्तुतीचा गौरव दिन (दिनांक: ०७ नोव्हेंबर, २०२५)
  • 2
    Pariksha Pe charcha 2022, 1st April 2022 at 11 a.m.
Events
  • 07 Nov
    'वंदे मातरम' ची 150 वर्षे, सार्धशताब्दी' सोहळा 'वंदे मातरम' ची 150 वर्षे, सार्धशताब्दी' सोहळा - भारतमातेच्या स्तुतीचा गौरव दिन (दिनांक: ०७ नोव्हेंबर, २०२५) जयानंद मठकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सावंतवाडी. वंदे मातरम या राष्ट्रगीताच्या १५० वर्षांच्या गौरवशाली पूर्तीनिमित्त, 'वंदे मातरम सार्धशताब्दी' महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भारतमातेच्या स्तुतीचा गौरव दिन म्हणून साजरा झालेला हा सोहळा जयानंद मठकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यांच्यावतीने राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, सावंतवाडी यांच्या पातान्गानामध्ये मोठ्या उत्साहात व सुंदर वातावरणात संपन्न झाला. या वेळी वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी सुमारे १६५० विध्यार्थी, शिक्षक वर्ग, पालकवर्ग, प्रतिष्ठीत नागरिक, विविध क्षेत्रातील सन्माननीय ......Read More
  • 15 Sep
    संविधान मंदिर उद्घाटन समारंभ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावंतवाड़ी येथे दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी संविधान मंदिराचे उद्घाटन करण्यात आले.
  • 10 Feb