दादा वासवानी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उल्हासनगर
सेंट्रल हॉस्पिटल जवळ, सेवासदन कॉलेज समोर, उल्हासनगर-०३ (जिल्हा- ठाणे)
Email ID : iti.ulhasnagar@dvet.gov.in
उल्हासनगर शहरात असलेल्या 'दादा वासवानी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उल्हासनगर' म्हणजेच आय.टी.आय.उल्हासनगर मध्ये इलेक्ट्रॉनिक्स(ELTN), फिटर(FT), वेल्डर(WD) व कॉम्प्युटर(COPA) हे चार ट्रेड (व्यवसाय) शिकविले जातात. यापैकी इलेक्ट्रॉनिक्स (ELTN) आणि फिटर (FT) हे ट्रेड दोन वर्षे एवढ्या कालावधीचे आहेत तर वेल्डर (WD) आणि कॉम्प्युटर (COPA) या ट्रेड्स चा कालावधी एक वर्ष एवढा आहे.
आय.टी.आय.च्या नियमित ट्रेडला प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी इयत्ता दहावी (SSC) चा निकाल(Result) लागल्यानंतर प्रवेश प्रक्रिया सुरु होते. हि प्रवेशप्रक्रिया फक्त ऑनलाईन पद्धतीनेच राबविण्यात येते.
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी (फॉर्म भरण्यासाठी) पुढील संकेत स्थळाला भेट द्या. https://admission.dvet.gov.in
अल्पमुदत अभ्यासक्रम (Short Term Courses)
नियमित ट्रेड्स व्यतिरिक्त आय.टी.आय. उल्हासनगर येथे काही अल्पमुदतीचे अभ्यासक्रम (कोर्स) शिकविले जातात. येथे खालील अल्पमुदत अभ्यासक्रम सुरु आहेत.आय.टी.आय.उल्हासनगर चे युट्यूब चॅनल : https://youtube.com/@ITIUlhasnagar
Dear Students, Parents and Honourable Guests,
It gives me immense pleasure to welcome you all to our Industrial Training Institute. Our institute has been established in 2007 with the vision of imparting quality technical education and skill-based training to empower the youth for a brighter future.
We firmly believe that skill development is the foundation of progress, both for individuals and for the nation. Here, students are not only trained in technical knowledge but are also encouraged to develop discipline, responsibility and values that will help them excel in life.
Parents, your continuous support and guidance play a vital role in shaping the future of our students. Together, we can ensure that they receive the best possible education and training. To our students, I would like to say: make the best use of the facilities and opportunities available to you, work with dedication, and strive for excellence in all that you do.
I extend my heartfelt gratitude to all the dignitaries and well-wishers who stand with us in this mission. Let us work hand in hand to create skilled, confident, and responsible citizens for our society and our nation.
With warm Regards,
Bansilal E. Sonkamble
Principal,
Dada Vaswani Govt. Industrial Training Institute Ulhasnagar.
या संस्थेत दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेचे प्रभारी गटनिदेशक श्री.चव्हाण एम.टी. यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी श्री चव्हाण एम.टी. व श्री.कवाणे ए.व्ही. यांनी शिवरायांच्या कार्याविषयी उपस्थितांना संबोधित केले.
आज दिनांक 07/11/2025 रोजी दादा वासवानी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था उल्हासनगर येथे 'वंदे मातरम' या सुप्रसिद्ध राष्ट्रीय गीतास 150 वर्ष पूर्ण होत असल्याने "वंदे मातरम् सार्धशताब्दी महोत्सव" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. कुमारजी आयलानी साहेब (आमदार, उल्हासनगर), कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्रीमती कल्याणी कदम मॅडम (तहसीलदार, उल्हासनगर तालुका), सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास प्रतिनिधी मा. श्री. साबळे साहेब, शिक्षण विभाग प्रतिनिधी मा. श्री. भास्कर शिंदे साहेब, स्थानिक पोलीस स्टेशन अधिकारी मा. श्री. नितीनजी डगळे साहेब, शिक्षण संस्था प्रतिनिधी मा. गुरुनानी साहेब, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी मा. श्री. मोहनजी बालानी साहेब, महिला बचत गट प्रमुख सौ. जयश्री चव्हाण मॅडम आणि इतर तालुकास्तरीय समिती सदस्य, तसेच तालुक्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालये / संस्थेचे अधिकारी कर्मचारी आणि औ. प्र. संस्था उल्हासनगर, शासकीय तांत्रिक विद्यालय उल्हासनगर, उल्हासनगर शहरातील शाळा / महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानिमित्ताने विद्यार्थ्यांनी 'वंदे मातरम' बाबत एक नाटिका सादर केली तसेच विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य आणि विविध कलात्मक कार्यक्रम सादर केले. हा समारोह/उत्सव अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.

विभाजन विभीषीका स्मृतीदिवस २०२५
जागतिक योग दिवस 2025
शिवराज्याभिषेक दिवस २०२५