Directorate of Vocational Education and Training, Maharashtra State
PADMASHRI SINDHUTAI SAPKAL GOVERNMENT INDUSTRIAL TRAINING INSTITUTE, (ADIVASI), SHAHAPUR,TAL: SHAHAPUR, DIST: THANE |
|||||||
Admission Year 2024-2025 | |||||||
SR. NO. | TRADE | DURATION | APPROVED UNITS | TRAINEES CAPACITY | QUALIFICATION | ||
CAP | IMC | TOTAL | |||||
01 | Computer Operator and Programming Assistant | 01 Yr | 02 | 38 | 10 | 48 | SSC PASS |
02 | Dress Making | 01 Yr | 01 | 16 | 04 | 20 | SSC PASS /FAIL |
03 | Electrician | 02 Yr | 02 | 32 | 08 | 40 | SSC PASS |
04 | Fashion Design & Technology | 01 Yr | 01 | 16 | 04 | 20 | SSC PASS |
05 | Fitter | 02 Yr | 02 | 32 | 08 | 40 | SSC PASS |
06 | Machinist | 02 Yr | 02 | 32 | 08 | 40 | SSC PASS |
07 | Mechanic Motor Vehicle | 02 Yr | 02 | 38 | 10 | 48 | SSC PASS |
08 | Pump Operator cum Mechanic | 01 Yr | 01 | 16 | 04 | 20 | SSC PASS |
09 | Turner | 02 Yr | 02 | 32 | 08 | 40 | SSC PASS |
10 | Welder | 01 Yr | 02 | 32 | 08 | 40 | SSC PASS / FAIL |
मा. प्रशिक्षणार्थी व पालकगण,
सप्रेम नमस्कार!
आपल्या सर्वांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, पद्मश्री सिंधुताई सपकाळ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शहापूर, जिल्हा ठाणे ही संस्था दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व्यावसायिक प्रशिक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. आमच्या संस्थेत विविध औद्योगिक क्षेत्रांतील अभ्यासक्रम उपलब्ध असून, येथील प्रशिक्षणाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर बनविणे आणि त्यांना रोजगारक्षम कौशल्यांनी सुसज्ज करणे हे आहे.
संस्थेची भौगोलिक स्थिती जरी दुर्गम भागात असली, तरी येथे विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रशिक्षक, आधुनिक यंत्रसामग्री, तसेच रोजगाराभिमुख मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येते. प्रशिक्षण घेत असलेले विद्यार्थी विविध सरकारी, खाजगी व स्वयंरोजगाराच्या संधींमध्ये यशस्वीपणे आपले स्थान मिळवत आहेत.
सर्व पालक आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी संस्थेबाबत सकारात्मक दृष्टी ठेवून, आपल्या पाल्यांना या संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. हे प्रशिक्षण त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक ठोस पाऊल ठरेल, अशी आम्हाला खात्री आहे.
आपल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार.
आपला विश्वासू,
प्राचार्य
पद्मश्री सिंधुताई सपकाळ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,शहापूर, जिल्हा ठाणे
Mr. RAM A. HIRE
PRINCIPAL
PADMASHRI SINDHUTAI SAPKAL GOVERNMENT INDUSTRIAL TRAINING INSTITUTE SHAHAPUR
Hurry up...Admission is going on .....please visit www.admission.dvet.gov.in
दि. 08 ऑक्टोबर 2025 रोजी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील 419 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच शासकीय तांत्रिक विद्यालय, शहापूर येथे अल्प मुदत व्यवसाय अभ्यासक्रमांचे ऑनलाईन उद्घाटन पार पडले. या निमित्ताने पद्मश्री सिंधुताई सपकाळ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शहापूर येथे तालुका स्तरावर “कौशल्य प्रशिक्षण जागृती अभियान” हा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. दिनेश घोलप, विस्तार अधिकारी, पंचायत समिती शहापूर, होते. कार्यक्रमाचे उद्घाटन विश्वकर्मा प्रतिनिधी श्री. विनोद शिंदे व श्रीमती सिद्धी राऊत यांच्या हस्ते झाले. त्यांच्या तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते “Electric Vehicle Service Technician”, “Self-Employed Tailor”, “Goods and Service Tax Account (GST) Assistant” व “Electrician Domestic Solution” या नव्याने सुसज्ज व्यवसाय प्रयोगशाळांचे (Updated Labs) उद्घाटनही संपन्न झाले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार श्री. जनार्दन भेरे, पत्रकार श्री. सुनिल घरत, श्री. पंडित मसणे, श्रीमती ईशा भरोदे (उद्योजक), श्रीमती नम्रता बांगर (उद्योजक), श्री. नीतेश लोने (उद्योजक), श्री. सुनिल नीचीते (उद्योजक) तसेच श्रीमती रंजना थोरात व श्रीमती प्रणाली सपाट (स्थानिक बचत गट प्रतिनिधी) उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात माऊली सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर प्राचार्य श्री. राम हिरे यांनी स्वागतपर भाषण करून अल्प मुदत व्यवसाय अभ्यासक्रमांच्या राबविण्याचा उद्देश आणि युवकांना रोजगारक्षम बनविण्याच्या या उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले. पत्रकार श्री. जनार्दन भेरे यांनी आपल्या भाषणात कौशल्याधारित शिक्षणाचे सामाजिक आणि आर्थिक महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी विद्यार्थ्यांना नव्या कौशल्यांचा आत्मविश्वासाने स्वीकार करण्याचे आवाहन केले.
पत्रकार श्री. सुनिल घरत यांनी “स्वावलंबनासाठी कौशल्य हाच खरा पाया” असे सांगत स्थानिक स्तरावर उपलब्ध प्रशिक्षण संधींचा लाभ घेण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले. मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन माध्यमातून संवाद साधत महाराष्ट्रातील 419 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नव्याने सुरू झालेल्या अल्प मुदत व्यवसाय अभ्यासक्रमांचे कौतुक केले. त्यांनी या प्रशिक्षणांमुळे युवकांना रोजगार, उद्योजकता आणि आत्मनिर्भरतेच्या नव्या संधी उपलब्ध झाल्याचे सांगून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून श्री. जीवन पाटील (शिल्पनिदेशक), श्री. प्रशांत घनगाव (शिल्पनिदेशक), श्री. नितिन महाजन (सहायक अधिव्याख्याता) आणि श्री. राजेश खांडे (निदेशक) यांनी प्रभावी नियोजन केले. सूत्रसंचालन श्रीमती दीपिका माळी (निदेशक) व श्रीमती श्वेता साळुंखे (निदेशक) यांनी उत्कृष्टरीत्या केले. या कार्यक्रमास ३५० प्रशिक्षणार्थी तसेच १५० स्थानिक नागरिक मोठ्या उत्साहाने उपस्थित होते. संस्थेतील सर्व शिल्पनिदेशक व कार्यालयीन कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी विशेष मेहनत घेतली. या उपक्रमामुळे शहापूर तालुक्यातील युवकांमध्ये कौशल्य शिक्षण, अल्प मुदत अभ्यासक्रम आणि उद्योजकतेविषयी जागरूकता निर्माण झाली, तसेच स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीची नवी दिशा निर्माण झाली.
महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी – पद्मश्री सिंधुताई सपकाळ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शहापूर
आज दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी, पद्मश्री सिंधुताई सपकाळ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शहापूर (जिल्हा ठाणे) येथे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात व गौरवपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली. या प्रसंगी संस्थेचे प्राचार्य यांनी जयंतीचे औचित्य साधून उपस्थितांना महात्मा फुले यांचे समाजसुधारणेतील कार्य, स्त्रीशिक्षण व शेतकरीहितासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, तसेच त्यांचे विचार याबाबत मार्मिक मार्गदर्शन केले.
प्राचार्यांनी आपल्या भाषणात महात्मा फुले यांच्या आदर्श जीवनशैलीवर प्रकाश टाकताना विद्यार्थ्यांना समानता, शिक्षणाचा प्रसार आणि सामाजिक समतेच्या मूल्यांची जपणूक करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमात संस्था कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहभागामुळे कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी व यशस्वी ठरला.