Nandi Foundation training conducted at ITI Vikramgad
2
करिअर मार्गदर्शन शिबीर
दि. २६ मे २०२३ रोजी विक्रमगडमधील आमराई रिसॉर्ट सभागृह येथे छत्रपती शाहू महाराज करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे.
3
प्रवेश प्रोत्साहन अभियान -
प्रवेश सत्र २०२१-२२ करिता ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरु आहे. आय.टी.आय. प्रवेश प्रक्रियेबाबत जनजागृती होण्यासाठी आणि जास्तीत जास्त उमेदवारांनी प्रवेश अर्ज करावेत याकरिता आय.टी.आय.विक्रमगड "संस्थेमार्फत प्रवेश प्रोत्साहन अभियान" अंतर्गत विक्रमगड शहरात मुख्य चौक, बस स्टॉप इत्यादी ठिकाणी माहिती दर्शक फलक (फ़्लेक्स बॅनर) लावले. तसेच कार्यक्षेत्रातील विविध माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये जाऊन याबाबत माहिती दिली.
4
प्राचार्य पदावर श्री.आर.पी.चुंबळेऔद्योगिक प्राशिक्षण संस्था विक्रमगड च्या प्राचार्य पदाचा अतिरिक्त कार्यभार औ. प्र. संस्था पालघर चे प्राचार्य श्री.एस.एन.परदेशी यांच्याकडे मार्च २०१७ पासून होता. त्यांची बदली औ. प्र. संस्था मुलुंड (जि.ठाणे) येथे झाल्यामुळे त्यांच्याकडे असलेला हा अतिरिक्त कार्यभार औ. प्र. संस्था मोखाडा (जि.पालघर) चे प्राचार्य श्री.आर.पी.चुंबळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
श्री.आर.पी.चुंबळे यांनी दि.०५/०६/२०२१ रोजी औ. प्र. संस्था विक्रमगड च्या प्राचार्य पदाचा अतिरिक्त कार्यभार स्विकारला.
Events
26May
राजर्षी शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर दिनांक २६/०५/२०२३ रोजी "आमराई रिसॉर्ट सभागृह, विक्रमगड" येथे सकाळी ०९.०० ते दु. ०१.०० या वेळेत आय.टी.आय.विक्रमगड कडून "राजर्षी शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबीर" घेण्यात येणार आहे. विक्रमगड, जव्हार, वाडा, मोखाडा या परिसरातील नवयुवकांनी ( विशेषतः:१५ ते २५ वयोगटातील तरुणांनी) या मार्गदर्शन शिबिराचा आवश्य लाभ घ्यावा. या शिबिरात दहावी-बारावीनंतर पुढे करिअर च्या वाटा, रोजगार-स्वयंरोजगार तसेच विविध अनुषंगिक विषयांवर ख्यातनाम तज्ञ मार्गदर्शक नवतरुणांना मार्गदर्शन करणार आहेत.
खाली दिलेला QR कोड स्कॅन करून आपण या करिअर शिबिरासाठी आपली नोंदणी करू शकता. वर दिलेला QR कोड स्कॅन करून आपण या करिअर शिबिरासाठी आपली नोंदणी करू शकता.
या शिबिरातील दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा सर्व साधारणपणे खालील कार्यक्रम पत्रिकेनुसार राहील.
09Aug
आदिवासी दिन -
या संस्थेत दि. ०९ ऑगस्ट २०२१ रोजी आद्य आदिवासी क्रांतिकारक "बिरसा मुंडा" यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून "आदिवासी दिन" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
05Jun
वृक्षारोपण - जागतिक पर्यावरण दिन (०५ जुन २०२१) आज दि. ०५/०६/२०२१ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था विक्रमगड या संस्थेच्या प्राचार्य पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. आर. पी. चुंबळे यांनी श्री. एस. एन. परदेशी यांच्याकडून स्विकारला. आज येथे ०५ जून २०२१ रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले.