[:en]शासकीय तांत्रिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, पेण ही संस्था सन 1970 पासून पेण येथे कार्यरत आहे. या संस्थेमध्ये पेण व शेजारील परिसरातील विद्यार्थ्यांना 9 ते 12 पर्यंत तांत्रिक विषयाचे प्रशिक्षण दिले जाते. या संस्थेमध्ये पूर्व व्यवसाय अभ्यासक्रमाअंतर्गत इयत्ता 9 वी व 10 वी चे पेण तालुक्यातील चार संलग्न विद्यालयाचे दरवर्षी एकूण 360 विद्यार्थी प्रशिक्षण घेतात. विद्यार्थ्यांना इयता 9 वी व 10 वी मध्ये इलेक्ट्रिकल व मेकॅनिकल विषयाचे मुलभूत प्रशिक्षण दिले जाते. 10 वी नंतर विद्यार्थी तांत्रिक विषयाच्या उच्च शिक्षणाकडे जातात.
इयत्ता 11 वी व 12 वी मध्ये इलेक्ट्रिकल व स्कुटर मोटर सायकल दुरुस्ती बाबत मुलभुत प्रशिक्षण देण्यात येते. 12 वी नंतर विद्यार्थी इंजिनिअरिंग विभागकडे उच्च शिक्षणासाठी जातात.[:]