या संस्थेची स्थापना सन २००६ या वर्षी झाली आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई (महाराष्ट्र शासन) यांच्या अधिपत्याखाली विक्रमगड (जिल्हा- पालघर) येथे हि संस्था सुरु आहे. आदिवासी बहुल क्षेत्रात असणाऱ्या विक्रमगड या तालुक्यातील युवकांना आधुनिक औद्योगिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगार करण्यास सक्षम बनविण्यासाठी हि संस्था अविरत कार्यरत आहे.
या संस्थेत एकूण 0८ व्यवसाय (ट्रेड) आहेत. या 0८ व्यवसाय (ट्रेड) पैकी ०४ ट्रेड हे 'एक वर्ष' मुदतीचे तर ०४ ट्रेड 'दोन वर्ष' मुदतीचे आहेत. प्रत्येक ट्रेडच्या फक्त एकाच तुकडीला मान्यता असल्याने फक्त ०८ तुकड्या सुरु आहेत. त्यांचे विवरण खालील कोष्टकात (टेबलमध्ये) दिले आहे. प्रत्येक ट्रेडच्या फक्त एकाच तुकडीला मंजुरी असल्यामुळे दोन वर्षे मुदतीच्या ट्रेड पैकी MMV, FT आणि ET, TDM हे ट्रेड एका वर्षा आड प्रवेशाकरिता उपलब्ध असतात. एक वर्ष मुदतीचे सर्व ट्रेड दरवर्षी प्रवेशासाठी उपलब्ध असतात.
| अ.क्र. | व्यवसाय (ट्रेड) | मंजूर जागा | प्रवेशसत्र 2023-24 साठी उपलब्ध जागा | प्रशिक्षण कालावधी | सविस्तर माहिती |
| 1 | इलेक्ट्रिशियन [ET] | 20 | 20 | 2 वर्षे | अभ्यासक्रम |
| 2 | टूल & डाय मेकर [TDM-D&M] | 24 | 24 | 2 वर्षे | अभ्यासक्रम |
| 3 | फिटर [FT] | 20 | 00 | 2 वर्षे | अभ्यासक्रम |
| 4 | मेकॅनिक मोटर वेहीकल [MMV] | 24 | 00 | 2 वर्षे | अभ्यासक्रम |
| 5 | वेल्डर [WD] | 20 | 20 | 1 वर्ष | अभ्यासक्रम |
| 6 | मेकॅनिक डिझेल [DLM] | 24 | 24 | 1 वर्ष | अभ्यासक्रम |
| 7 | सुईंग टेक्नोलॉजी [ST] | 20 | 20 | 1 वर्ष | अभ्यासक्रम |
| 8 | कॉम्प्युटर ऑपरेटर & प्रोग्रामिंग असिस्टंट [COPA] | 24 | 24 | 1 वर्ष | अभ्यासक्रम Visit COPA Lab |
|
एकूण = |
176 | 132 |
कौशल्य विकास म्हणजेच प्रगती हमखास
आपला महाराष्ट्र हे औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर असे राज्य आहे. आपला तालुका व जिल्ह्यालगतच्या परिसरातही अनेक औद्योगिक आस्थापना (कंपन्या) आहेत. या विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कंपन्यांमध्ये अनेक रोजगाराच्या संधी (नोकऱ्या) उपलब्ध आहेत. स्थानिक तरुणांनी या संधीचा आपल्या रोजगारासाठी उपयोग करून घ्यावा. त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपल्या आवडीच्या व्यवसायाचे औद्योगिक प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे.
'औद्योगिक प्रशिक्षण संस्था विक्रमगड' हि शासकीय संस्था विक्रमगड येथे कार्यरत असून या संस्थेत उद्योगक्षेत्रातील विविध व्यवसायांचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाद्वारे तरुणांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी सक्षम बनविले जाते. महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या संधीचा तरुणांनी अधिकाधिक उपयोग करून स्वत:ला रोजगार अथवा स्वयंरोजगारासाठी सक्षम बनवावे.
--- श्री.आर.पी.चुंबळे (प्राचार्य, औ.प्र.संस्था विक्रमगड)
[:mr]

[:]
दि. २६ मे २०२३ रोजी विक्रमगडमधील आमराई रिसॉर्ट सभागृह येथे छत्रपती शाहू महाराज करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित केले आहे.
वर दिलेला QR कोड स्कॅन करून आपण या करिअर शिबिरासाठी आपली नोंदणी करू शकता.
या संस्थेत दि. ०९ ऑगस्ट २०२१ रोजी आद्य आदिवासी क्रांतिकारक "बिरसा मुंडा" यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून "आदिवासी दिन" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
आज दि. ०५/०६/२०२१ रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था विक्रमगड या संस्थेच्या प्राचार्य पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. आर. पी. चुंबळे यांनी श्री. एस. एन. परदेशी यांच्याकडून स्विकारला. आज येथे ०५ जून २०२१ रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले.