शासकिय चर्मकला विद्यालय या संस्थेची स्थापना 1939 मध्ये वांद्रे खेरवाडी येथे करण्यात आली. खेरवाडी येथे अनेक चर्मकलेचे कारखाने सुरू होते. चर्म कारागीरांना व त्यांच्या मुलांना चर्मकलेचे योग्य ते प्रशिक्षण मिळणेकरिता मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. बाळासाहेब गंगाधर खेर यांनी वांद्रे खेरवाडी येथे लेदर टेक्नालॉजी व शासकिय चर्मकला विद्यालय दोन प्रशिक्षण संस्थांची स्थापना केली. |
सद्य स्थितीत शासकिय चर्मकला विद्यालयात कौशल्य विकास व व्यवसाय शिक्षण परिक्षा मंडळ मुंबई यांचे खालिल आभ्यासक्रम सुरू आहेत
Sr.No. | Name of Course | Duration | Entrance Qualification | Intake |
1 | Certificate Course in Handmade Shoe Making | One Year | SSC | 25 |
2 | Certificate Course in Handmade Chappal and Sandal | 6 Month | 8th Pass | 25 |
3 | Certificate Course in Handmade Leather Goods | 6 Month | 8th Pass | 25 |
शासकीय चर्म कला विद्यालय ही संस्था कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांच्या अंतर्गत असून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय यांच्या अंतर्गत कार्यरत आहे या संस्थेमध्ये विविध चामड्याच्या वस्तू बनवणे विविध फुटवेअर बनवणे या आशयाचे सहा महिने कालावधीचे तसेच एक वर्ष कालावधीचे अभ्यासक्रम शिकवले जातात सदरचे अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ यांचे शासनाची मान्यता प्राप्त असून ते अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर या क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान प्राप्त होते तसेच रोजगार व स्वयंरोजगार मिळवून उमेदवार आत्म निर्भय होण्यास मदत होते तसेच गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना या क्षेत्रात अद्यावत ज्ञान प्राप्त झाल्यास स्वावलंबी होऊ शकतात. |