महिलांसाठी सुवर्णसंधी! रमाबाई आंबेडकर शासकीय ITI, दादर प्रवेश २०२६ महिलांसाठी सुवर्णसंधी! रमाबाई आंबेडकर शासकीय ITI, दादर प्रवेश २०२६

महिलांसाठी सुवर्णसंधी! रमाबाई आंबेडकर शासकीय ITI, दादर प्रवेश २०२६ 🎓
​आपल्या करिअरला द्या एक नवी दिशा! दादर येथील नामांकित महिला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत २०२६ सत्रासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होत आहे.
​उपलब्ध कोर्सेस (Trades):
​COPA (कॉम्प्युटर ऑपरेटर)
​Cosmetology (कॉस्मेटोलॉजी)
​Fashion Design & Technology (फॅशन डिझाइन)
​Interior Design & Decoration (इंटीरियर डिझाइन)
​Electronics Mechanic (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक)
​…आणि इतर अनेक कोर्सेस (Dress Making, Painter, Secretarial Practice).
​का निवडावे शासकीय ITI?
​✅ कालावधी: १ ते २ वर्षांचे कोर्सेस.
✅ पात्रता: १० वी उत्तीर्ण / अनुत्तीर्ण.
✅ प्रशिक्षण: नामांकित शासकीय व खासगी आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारी (Apprenticeship) उपलब्ध.
✅ सवलत: शासनाकडून स्वयंरोजगारासाठी संपूर्ण मार्गदर्शन व मदत.
✅ मान्यता: २ वर्षांचा कोर्स पूर्ण झाल्यावर १२ वीच्या समकक्षता प्रमाणपत्र मिळण्यास पात्र.
​📍 प्रवेशासाठी महत्त्वाची माहिती:
​प्रवेश प्रक्रिया: ऑनलाईन (१० वीचा निकाल लागल्याच्या दुसऱ्या दिवसापासून).
​वेबसाइट: https://admission.dvet.gov.in
​प्रवेश फी: अल्प दरात (शासकीय नियमानुसार).
​📞 अधिक माहितीसाठी संपर्क:
​📍 ५ वा मजला, ३७४, वीर सावरकर मार्ग, आगर बाजार, दादर (पश्चिम), मुंबई – ४०० ०२८.
📱 संपर्क क्रमांक: 8381027504 / 9137653492 / 9226981269
📧 ईमेल: iti.dadarg@dvet.gov. in
प्राचार्य, रमाबाई आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (महिला), दादर
​#ITIAdmission #WomenEmpowerment #SkillIndia #DadarITI #CareerGuidance #VocationalTraining #MumbaiEducation

१९/०२/२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरा करण्यात आली.

२६/०१/२०२६ रोजी गणराज्य दिन साजरा करण्यात आला.

तालुक्याच्या विविध ठिकाणी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी स्वामी विवेकानंद यांच्या जीवन चरित्रावर आधारित व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. महिलांनी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले. सकल मराठा समाज मच्छे विभाग यांच्यावतीने जिजामाता चौक, मच्छे येथे राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख वक्ते म्हणून सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज जयाजीराव मोहिते व बालोजी डुबल हे उपस्थित होते.

भारताच्या स्त्री शिक्षणाची गंगोत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई जोतीराव फुले यांच्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे ३ जानेवारी, इ.स. १८३१ रोजी झाला. आईचं नाव लक्ष्मीबाई तर वडिलांचं नाव खंडोजी नेवसे पाटील होते. त्यांचे वडील गावाचे पाटील होते. स्त्री स्वातंत्र्य औषधालाही नसलेल्या समाजात व काळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. सावित्रीबाई या ९ वर्षांच्या असताना इस १८४० मध्ये त्यांचा विवाह १३वर्षे वयाच्या महात्मा जोतिबा फुले यांच्याशी झाला.

२६ डिसेंबर २०२५ वीर बाल दिवस

७ नोव्हेंबर २०२६ वंदे मातरम् गीताच्या १५० व्या वर्धापन दिवस साजरा करण्यात आला

 

२६ नोव्हेंबर २०२५ भारतीय संविधान दिन

 

दिनांक 21 जुन 2025 रोजी आय टी आय विक्रमगड येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. आलेले पाहुणे 1. बी. के. पुजा बेन 2. बी. के. दीपक भाई 3. किरण मोहंडकर

शिवराज्याभिषेक दिन सोहळा.