कारगिल विजय दिवस- २६ जुलै २०२५ -लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी
कारगिल विजय दिवस साजरा – २६ जुलै २०२५
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी येथे दिनांक २६ जुलै २०२५ रोजी कारगिल विजय दिवस अत्यंत उत्साहात व देशभक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
या विशेष प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. रविराज देवरे (कॅप्टन), श्री. अनुराजा पाटील (हवालदार), श्री. संतोष कांबळे (शिपाई), श्री. समीर शेख (हवालदार), श्री. शंकरराव मिळके (नाईक), श्री. अरुण कांबळे , श्रीमती ऋतुजा चिगरे (वीर पत्नी) यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच श्री. स्वप्निल सावंत आणि श्री. रोहित कांबळे (IMC सदस्य) यांनीही आपली उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनात श्री एस. जोशी आणि मार्गदर्शनात स्वप्ना धायगुडे मॅडम (वक्ता) यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.
संस्थेचे निदेशक, सर्व कर्मचारीवृंद तसेच प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने या देशभक्तिपर कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
शहीद सैनिकांच्या त्यागाला आदरांजली अर्पण करत त्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी आपले अनुभव आणि विचार व्यक्त करून उपस्थितांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागवली.
जागतिक युवा कौशल्य दिन – 15 जुलै 2025 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, रत्नागिरी
शिवराज्याभिषेक दिन सोहळा.
शासकीय तांत्रिक विद्यालय बदलापूर येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जून २०२५ रोजी साजरा करण्यात आला