Fruit and Vegetable Processing

 

आपल्या देशात प्रत्येक हंगामात विविध प्रकारची फळे उत्पादित केली जातात पण त्या फळांवर प्रक्रिया न झाल्याने त्यातील बहुतांश फळे किंवा शेतमाल शेतकऱ्याच्या शेतात पडून राहतो किंवा कमी किमतीत विकावा लागतो जर या पद्धतीने प्रत्येक फळावर फळ प्रक्रिया केली व विविध प्रकारचे पदार्थ तयार केले तर शेतकऱ्याला त्याच्या फळाचा त्याच्या श्रमाचा योग्य मोबदला मिळून शेतकरी ग्रामीण भाग आर्थिक दृष्ट्या सक्षम बनू शकतो म्हणूनच आम्ही तयार केलेल्या कोकण प्रॉडक्ट चा वापर करून कोकणातले शेतकरी आत्मनिर्भर बनू शकतात.

तयार केलेले हे सर्व पदार्थ या त्या हंगामात येणाऱ्या स्थानिक फळांपासून व फक्त नैसर्गिक पदार्थापासून तयार केल्याने त्यांची गुणवत्ता अधिक वाढते.कोणत्याही हानिकारक रसायनांचा वापर न केल्याने हे सर्व पदार्थ मानवी आरोग्यास ,सेवन करण्यास उपयुक्त ठरतात.तसेच या सर्व फळांचे औषधी गुणधर्म या विविध पदार्थांमध्ये आपोआपच उतरतात.
विविध आजारांवर हे पदार्थ उपयुक्त ठरू शकतात .उदाहरणार्थ .कोकम, कोकम सरबत ,कोकम आगळ हे पित्त विकारांवर उपयुक्त ठरते.

We learn here…