जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी पालघर येथे एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न.
पालघर (प्रतिनिधी)जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी पालघर येथे दिनांक 8-4-2025 रोजी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा पार पडली. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्ह्याचे जिल्हा व्यवसाय शिक्ष सीण व प्रशिक्षण अधिकारी महेश कुमार दयानंद सिडाम यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य संजय भोई यांनी केले. या कार्यशाळेची गरज विशद केली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून राईट वर्क फाउंडेशनच्या मेहा सावंत, ख्याती द्विवेदी, सी आय आय च्या पाटील मॅडम, प्राचार्य चुंबळे, प्राचार्य पाटील, प्राचार्य बंजारा, प्राचार्य कांबळे(नुकतेच वसई भूषण पुरस्काराने सन्मानित), प्राचार्य खंदारे उपस्थित होते. याप्रसंगी जिल्ह्यातील सोळा आयटीयातील प्राचार्य गटनिर्देशक आणि निदेशक उपस्थित होते.
क.प्रशिक्षणार्थी सल्लागार प्रशांत बोकंद यांनी शिकाऊ उमेदवारी योजना केंद्र सरकारची नॅप्सची योजना, महाराष्ट्र सरकारची मॅप्स ची योजना यासंबंधीची सखोल माहिती सादर केली. पीपीटी द्वारे प्रेझेंटेशन अपूर्वा भोईर यांनी केले. 31 मार्च 2025 पर्यंत 5000 मॅप से क्लेम हे पेंडिंग असताना ज्या कर्मचाऱ्यांनी अक्षरशः अहोरात्र जागरण करून ते काम पूर्ण करून दिले त्यांचा गौरव सत्कार या ठिकाणी करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य आयटीआय निदेशक संघटनेच्या मुंबई विभागाचे नवनिर्वाचितअध्यक्ष अनंत भंगाळे यांचा सन्मान करण्यात आला.
पालघर जिल्ह्यामध्ये शेकडो कंपनी असून जास्तीत जास्त कंपन्यांमध्ये भेटी देऊन त्या कंपन्यांना सरकारी योजना समजावून सांगण्याचे आवाहन याप्रसंगी सिडाम साहेब यांनी केले. यासाठी सर्व आयटीआय ना प्रत्यक्षात कंपन्यांमध्ये भेटी देऊन शिकाऊ उमेदवारी रोजगार योजनेच्या जागा वाढवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
पालघर आयटीआय मधील कर्मचारी आहेर सर,भानुसे सर,साळुंके सर,सोलंकी सर आणि सर्वच कर्मचारी वृंदानी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली.