राजे यशवंत मुकणे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), विक्रमगड येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन रविवारी साजरा करण्यात आले.
राष्ट्रीय युवा दिन साजरा
विक्रमगड, राजे यशवंत मुकणे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी), विक्रमगड येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती राष्ट्रीय युवा दिन रविवारी साजरा करण्यात आला.सदर दिवशी कार्यक्रमाचे उद्घाटन हे विक्रमगड तालुक्याच्या नायब तहसीलदार सुजाता वायाळ यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहूणे म्हणून विक्रमगड हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक तथा संस्था व्यवस्थापन समिती सदस्य संतोष हडबाळ, तसेच प्रमुख वक्ते म्हणून राज्यस्तरीय प्रसिद्ध सूत्रसंचालक नितीन आहेर व देवेंद्र ठाकरे उपस्थित होते. यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य रोहन चुंबळे यांनी भूषवले.विकसित भारतात तरुणांची भूमिका या विषयावर नितीन आहेर यांनी मार्गदर्शन केले. ज्या कालखंडात तरुण योग्य मार्गावरती राहिला. त्या कालखंडात समाजाची अतिव प्रगती झाली याउलट ज्या कालखंडात तरूण सुखासीन जीवनाकडे आयुष्याच्या ध्येय म्हणून पाहू लागला. त्यावेळी समाजाचा ऱ्हास झाला.


