राजे यशवंत मुकणे औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आदिवासी) विक्रमगड येथे एआय, रोबोटिक्स विषयावर विशेष प्रशिक्षण देण्यात आले .

ITI. विक्रमगड येथे एआय, रोबोटिक्स विषयावर विशेष प्रशिक्षण देण्यात आले .

विक्रमगड: राजे यशवंत मुकणे शा.औ.प्र.संस्था (आदिवासी) विक्रमगड, या संस्थेत प्राचार्य श्री.रोहन प्र.चुंबळे यांच्या आयोजनाने “द बॉम्बे मदर्स अॅण्ड चिल्ड्रेन वेल्फेअर सोसायटी” राजगुरूनगर, सूर्यतेज संस्था, कोपरगाव यांच्या वतीने अनुसूचित जाती व जमातीच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी एआय आणि रोबोटिक्स या विषयावर दि. २३, २४ आणि २५ जानेवारी २०२५ या तीन दिवसीय विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. विज्ञान आणि तंत्रद्यान युगात रोबोटिक्स उत्क्रांती होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि रोबोटिक्स तंत्रज्ञान युगात सर्व घटकांनी सहभागी व्हावे असे उद्घाटन प्रसंगी संस्थेचे प्रभारी गट निदेशक श्री.के.सी.गवळी यांनी मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणामध्ये एआय आणि रोबोटिक्स या कार्यशाळेतील श्री. उत्कर्ष पाटील आणि श्री.प्रीयांषु शर्मा यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे. प्रॅक्टिकल वर्क तसेच प्रमाणपत्र वाटप देखील करण्यात आले. या कार्यशाळेत १५० प्रशिक्षणार्थी हजर होते तसेच संस्थेतील श्री. राहुल वी.पाढेन यांनी कार्यशाळेबद्दल आभार व्यक्त केले. प्रशिक्षण दरम्यान श्रीम. भाविका बी.तुमडे सहभागी होते.